। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील रावढळ क्रिकेट क्लबला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा माजी कर्णधार गजानन बैकर आणि युवा कर्णधार संकेत गावडेच्या नेतृत्वाखाली सत्संग मैदान खारघर येथे घेण्यात आल्या. यामध्ये 32 संघाचा समावेश होता, तर श्री भैरी जोगेश्वरी वामने-अ यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या चषकाचा मानकरी ठरला.
या मर्यादित षटकांच्या आर.सी.सी. चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात चषकाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी श्री भैरी जोगेश्वरी वामने (अ), तर हनुमान स्पोर्ट्स क्लब सोनघर द्वीतीय क्रमांक विजेता, तृतीय पारितोषिक श्री दत्तकृपा क्रिकेट संघ अप्पर तुडील (अ) संघ, चतुर्थ क्रमांक चॅलेंजर कुडूक यांनी नाव कोरले तसेच उत्कृष्ट फलंदाज विकास भुवड, उत्कृष्ट गोलंदाज साहिल नाकते, तर आयुष धाडवेने मालिकावीरांचा किताब पटकावला. सदर विजेता संघाला पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम व आकर्षक चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हरेश मंगळेकर, सचिन बेर्डे, संतोष शिंदे, मंगेश लाले, मारुती शिंदे, प्रमोद जंगम, यशवंत मंगळेकर, पांडूरंग मंगळेकर, प्रशांत तोडकरी, विनोद जाधव, निलेश मोरे, संतोष सुकूम, कैलास शिंदे, कर्णधार संकेत गावडे, संकेत गावडे, रोशन बैकर, परेश रेशिम, तेजस शिंदे, तेजेस रेशिम, किशोर शिंदे, अनिकेत जाबडे, अमोल मांडवकर, ओमकार मंगळेकर, संतोष मंगळेकर, आशिष गावडे, ऋषिकेश रेशिम, शिवाजी रेशिम, भरत रेशिम, नितीन मंगळेकर, राहूल जाबडे, यश शिंदे, श्रेयस पातेरे, प्रणय रेशिम यांच्यासह आर.सी.सी. संघातील स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडू युवा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली असून राजेश पातेरे, अजय पातेरे, रोशन रेशीम, विनायक चव्हाण, सजित गावडे, युवा समालोचक हरेश गोलांबडे, यांचेही सहकार्य लाभले.







