रवी बिश्‍नोईच्या चेहर्‍याला दुखापत

। कोलंबो । वृत्तसंस्था ।

श्रीलंका आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 43 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सर्वच खेळाडूंनी भारताच्या या विजयात मोठे योगदान दिले आहे. भारताने दिलेल्या 214 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना फिरकीपटू रवी बिश्‍नोईसोबत मैदानात अपघात झाला. चेंडू त्याच्या डोळ्याच्या अगदी खाली लागला आणि तो जखमी झाला. त्याच्या डोळ्याखाली चेंडू इतक्या जोरात आदळला की रक्त येत होते.

रवी बिश्‍नोई श्रीलंकेच्या डावातील 16वे षटक टाकण्यासाठी आला होता. श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. बिश्‍नोईने गुगली बॉल टाकला ज्यावर त्याच्या बॅटची पुढची कड घेत चेंडू बिश्‍नोईच्या उजव्या दिशेने परत येत होता. बिष्णोई हा झेल टिपण्याचा प्रयत्न करत एक डाईव्ह केली. बिश्‍नोईने असे अनेक झेल टिपले आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्या अफलातून झेलचे व्हीडिओही पाहिले आहेत. त्यामुळे हा झेल टिपणे त्याच्यासाठी नवीन नव्हते. बिश्‍नोईने तो चेंडू पकडण्यासाठी डाईव्ह मारली आणि चेंडूही त्याने पकडला. पण एका हाताने झेल पकडता आला नाही.

Exit mobile version