रवींद्र चव्हाणांचा मुक्काम रायगडावर

शिंदे-फडणवीस सरकारचे बंगले वाटप जाहीर

। मुंबई । प्रतिनिधी ।

खातेवाटप नुकतेच जाहीर झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप मंगळवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुक्काम आता रायगडावर असणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले हवेत, यासाठीच्या सूचना मागावल्या होत्या. यादरम्यान कॅबिनेटमध्ये आमदारांचे रुसवे फुगवे बघायला मिळाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्र्यांनी कोणते बंगले हवेत, हेदेखील संबंधितांना कळवलं. त्यानंतर आज मंत्र्यांचं बंगले वाटप जाहीर करण्यात आलं आहेत.

बंगल्यांसाठी रुसवेफुगवे
अनेक बंगल्यांसाठी मंत्र्यांची रस्सीखेच पाहायला मिळत होती. त्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे अनेकांनी आर्जवही केलं. सेवासदन बंगल्यासाठी गिरीश महाजन आग्रही होते. यासाठी महाजनांनी विशेष प्रयत्न केले. तर, चंद्रकांत पाटलांना सिंहगड बंगला मिळाला आहे.

‘देवगिरी’ पवारांकडे कायम
सत्ता गेल्यानंतर शासकीय घरसुद्धा सोडावे लागते. पंरतु, विरोधी पक्षनेते अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेला ‘देवगिरी’ बंगला सोडावा लागणार नाही. कारण, हा बंगला पवार यांनाच देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहवा यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली होती.

कुणाला कुठला बंगला?

Exit mobile version