रवींद्र जडेजा घेणार निवृत्ती

लवकरच होणार अधिकृत घोषणा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीदरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला होता. आता त्याच्या दुखापतीदरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जडेजा क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार, अशी बातमी समोर आली आहे.
जागरण आणि स्पोर्ट्स कॅफे यांच्या वृत्तानुसार, जडेजा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्यासाठी कसोटीतून निवृत्त होणार असल्याचे वृत्त आहे. जडेजा न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग होता. कानपूर कसोटी सामन्यात त्याने श्रेयस अय्यरसोबत संघाला संकटातून बाहेर काढताना शानदार भागीदारी केली, तसेच शानदार गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या सामन्यात शानदार खेळ केल्यानंतर दुखापतीमुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला. दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून तो बाहेर आहे. जडेजाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Exit mobile version