। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील आवरे येथील रविंद्र मारुती म्हात्रे यांचे शनिवारी (दि.19) निधन झाले. निधनासमयी ते 44 वर्षांचे होते. आवरे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी (दि.28) खोपटे येथील नाना नानी पार्क येथे सकाळी 8ः00 वाजता हाणार आहे. तर, उत्तरकार्यविधी बुधवारी (दि.30) आवरे येथील राहत्या घरी सकाळी 11ः00 वाजता होणार असल्याची माहिती म्हात्रे परिवाराकडून देण्यात आली आहे.