। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
वडगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच विविध उपक्रम हाती घेत असते. त्यांची बोद्धिक क्षमता वाढावी या उद्देशाने ‘माझी शाळा, स्वच्छ शाळा’ या उपक्रमाअंतर्गत सामान्यज्ञान, घोषवाक्य, चित्रकला अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्यज्ञान स्पर्धेत देवेन पोपेटे, यश पाटील, घोषवाक्य स्पर्धेत कृतिका गडगे, कस्तुरी जाधव, चित्रकला रंगभरण स्पर्धेत समर्थ मुंढे, अद्विक शिंदे तसेच बेस्ट क्लासरूम स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. ही पारितोषिके अमाईन्स केमिकल्स या सी.एस.आर.फंडातून देण्यात आली. यावेळी वडगाव राजिप शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा शारिरीक तसेच बौद्धिक विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जात असते. त्यांच्या विकासासाठी अशा स्पर्धा होणे आवश्यक आहे.