रवींद्र म्हात्रे यांचे निधन

| सुकेळी | वार्ताहर |

नागोठणेजवळील वरवठणे येथील रवींद्र हरी म्हात्रे यांचे वयाच्या 45 व्या वर्षी शनिवारी (दि.11) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 7 वाजता वरवठणे येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, तीन बहिणी असा मोठा मित्र परिवार आहे. कै. रवींद्र यांचे दशक्रिया विधी सोमवार, दि.20 रोजी अंबा नदीकिनारी वरवठणे, तर उत्तरकार्य बुधवार, दि. 22 रोजी राहत्या घरी वरवठणे येथे होणार असल्याचे प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version