। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील कोप्रोली गावचे रहिवासी रवींद्र मधुसूदन म्हात्रे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून 34 वर्षाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा रविवारी (दि.30) जून कोप्रोली येथे माजी आ. मनोहर भोईर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. यावेळी महेंद्र ठाकूर, विश्वास म्हत्रे, कमलाकर पाटील, चंद्रशेखर ठाकूर, निर्भय म्हात्रे, शासकीय अधिकारी, कर्मचारी, म्हात्रे कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.