जेएनपीएच्या उपाध्यक्षपदी रवीश कुमार सिंग

| चिरनेर | प्रतिनिधी |

जेएनपीएच्या उपाध्यक्षपदी रवीश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी (दि.9) पदाची सूत्रे हाती घेतली. जेएनपीएमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी मध्य रेल्वेमध्ये उपमुख्य ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केले आहे. त्यांनी रेल्वे झोनमध्ये प्रमुख ऑपरेशनल धोरणे आणि कार्यक्षमता उपक्रमांचेही नेतृत्व केले आहे. सरकारी अनुभवा व्यतिरिक्त रवीश कुमार सिंह यांनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि एनटीपीसी लिमिटेड यासारख्या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांमध्येही योगदान दिले आहे. जेएनपीएत विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी त्यांचे स्वागत करुन पदाची सूत्रे सोपवली. रवीश कुमार सिंग यांची नियुक्तीने बहुक्षेत्रीय कौशल्य, धोरणात्मक दृष्टिकोन आणि ऑपरेशनल कौशल्यासह कार्यक्षमता, नवोपक्रम आणि भागधारक-केंद्रित वाढीसाठी जेएनपीएची वचनबद्धता मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version