आरबीआयने आकारले कोटीचे दंड

। मुंबई । वृत्तसंस्था ।
ग्राहकांची फसवणुक टाळण्यासंदर्भातील नियम न पाळल्याबद्दल स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा तर फसवणुकीच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहारांमधील रक्कम संबंधित खातेदाराला परत न दिल्याबद्दल स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला एक कोटी 95 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने आकरला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेतर्फे स्टेट बँकेतील खातेदारांचा तपशील तपासण्यात आला. स्टेट बँकेने फसवणुकीसंदर्भात माहिती कळवली नाही, असे त्यावेळी आढळले. त्यामुळे हा दंड केल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची खातेपुस्तके तपासल्यावर एका खातेदाराच्या खात्यातून इलेक्ट्रॉनिक फसवणुकीने काही रक्कम काढण्यात आली. ती रक्कम बँकेने खातेदाराला परत न दिल्याबद्दल स्टँनचार्ट बँकेला नोटिस देऊन, त्यांचे म्हणणे ऐकल्यावर ही कारवाई करण्यात आली. सायबर सिक्युरिटी चा भंग झाल्याच्या घटनांची माहितीही बँकेने वेळेत न कळविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version