आरसीबी संघाचे बदलले नाव

नव्या जर्सीत विजेतेपदाचे स्वप्न!

| मुंबई | वृत्तसंस्था |

आयपीएल 2024 च्या थराराला सुरुवात होण्यासाठी तीन दिवस बाकी असताना आरसीबी संघाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा आरसीबी संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार असून आता संघाच्या नावातही बदल केला गेला आहे. वुमन्स प्रीमियल लीगमधील आरसीबीने संघाने विजेतेपद जिंकल्यावर फ्रँचायसीने हा निर्णय घेतला आहे. आरसीबी संघाचे नवीन नाव काय आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. नावात काय बदल केला गेला आहे? तो बदल काय आहे जाणून घ्या.

आरसीबी संघांचे नवीन नाव हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असे करण्यात आले आहे. सुरूवातीला नेमका काय बदल केला हो कोणाच्या लक्षात नाही आले. आरसीबी संघाच्या नावातील बंगलोरच्या ऐवजी आता बंगळुरू केले आहे. 2014 मध्ये बंगलोर शहराच नाव बदलून बंगळुरू असे करण्यात आले होते. मात्र तेव्हा आरसीबीने आपल्या नावात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आता दहा वर्षांनी आरसीबीनेही नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबी संघाने जर्सीमध्येही बदल केला आहे, त्यामुळे नावात आणि जर्सीमध्ये बदल करत आरसीबी संघ कात टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. आरसीबीला आयपीएलमध्ये एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आत-बाहेर झाले, कॅप्टन बदलला पण अजुनही काही यश आले नाही. मात्र यंदा वुमन्स टीमने विजेतेद जिंकल्याने चाहत्यांना आता मेन्स टीमकडूनही विजेतेपदाच्या आशा आहेत. या हंगामामध्ये संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version