आरडीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

शेवटच्या चेंडूवर पेण बाप्पा संघ झाला चॅम्पियन

| पोयनाड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या टी-ट्वेन्टी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर पेण बाप्पा संघाला विजयासाठी एका चेंडूवर दोन धावांची गरज असताना पेण बाप्पा संघाचा हरहुन्नरी खेळाडू शेखर भगत यांनी निर्णायक दोन धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना समीरा हॅबिटेटेस अलिबाग जेट्स संघाने निर्धारित वीस षटकांमध्ये 9 गडी गमावत 146 धावसंख्या उभारली त्यामध्ये श्रेयस कुमार यांनी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वाधिक 71 धावा काढल्या त्याला मिहीर भाटकर यांनी 27, अभय पाटील 18, रितेश नलावडे यांनी 18 धावा काढून साथ दिली. पेण बाप्पा संघाकडून फिरकी गोलंदाज सागर मुळे यांनी 4 व जपजित सिंह यांनी 2 फलंदाज बाद केले. 147 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीला आलेल्या पेण बाप्पा संघाने सुरुवातीपासून धावगती सुरळीत ठेवली होती. सलामीवीर फलंदाज जपजित सिंह यांनी सर्वाधिक 71 धावा काढल्या तर नील कोळी 23, विनय ठाकूर यांनी 21 धावांचे योगदान संघाला दिले. शेवटच्या षटकात पेण संघाला जिंकण्यासाठी 7 धावा हव्या असतांना सामना शेवच्या चेंडू पर्यंत गेला. शेवटच्या चेंडूवर पेण संघानी विजयासाठी आवश्यक असणाऱ्या दोन धावा काढून विजय मिळवला आहे.

Exit mobile version