जुन्या पेन्शनचा पाठपुरावा करणार्‍या उमेदवाराला पुन्हा निवडून द्या

| कर्जत । वार्ताहर ।
कोंकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचे मतदान 30 जानेवारी होणार आहे. मागील वेळेच्या निवडणुकीत आपण बाळाराम पाटील यांना निवडून दिलेत. त्यांनी अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यातील बहुतांश सोडविल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी. यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी मतदारसंघातील सुमारे 85 टक्के शाळांना भेटी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची निवड सार्थकी लागली असे अनेकांची भावना आहे. जुनी पेन्शन योजना सुरू झाल्या शिवाय मी पेन्शन घेणार नाही. असे त्यांनी कर्जतमध्ये झालेल्या सभेत केले होते. त्यामुळे त्यांची त्यामागची कळकळ आपल्याला दिसत आहे. म्हणून या योजनेचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करणार्‍या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन महाविकास आघाडी कोंकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक निरीक्षक बबन म्हात्रे यांनी येथे केले.

कोंकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ कर्जत शहरातील अभिनव ज्ञान प्रशालेच्या सभागृहात शिक्षकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, शेतकरी कामगार पक्षाचे विलास थोरवे, सुधीर कांबळे, सच्चिदानंद जोशी, पुरोगामी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष जगदीश जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

म्हात्रे यांनी बाळाराम पाटील यांनी सहा वर्षात केलेल्या कामाचा आढावा सादर मआपण सुज्ञ मतदार आहेत. तरीही नजरचुकीने आपल्या कडून चूक होते व मत बाद होते. गेल्यावर्षी 37 हजार मते होती त्यापैकी 30 हजार 796 प्रत्यक्ष मतदान झाले व 1155 मते बाद झाली. यंदा 38 हजार 529 मतदार आहेत. मत बाद होऊ नये म्हणून मतपत्रिकेत इंग्रजी एक हे निळ्या शाईने लिहून मत द्या असे स्पष्ट केले.
जगदीश जाधव यांनी शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू केल्यास राज्य कर्जबाजारी होईल असे या सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या योजनेला त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. मात्र राज्यात शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागली आणि लगेचच पत्रकार परिषद घेऊन आम्ही जुनी पेन्शन योजना करण्याचा प्रयत्न करीत इतकेच नव्हे तर प्रस्तावही सादर केल्याचे सरकार सांगत आहे. त्यांनी हे आपल्याला गाजर दाखवले आहे. त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. जुनी पेन्शन योजनेचा सातत्याने पाठपुरावा करणार्‍या उमेदवाराला मते द्या असे स्पष्टपणे सांगितले. याप्रसंगी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version