वाचा अनुभव! पहिल्याच मुलाखतीत मला नोकरी मिळाली

अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील मी रहिवासी आहे. माझे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. शिक्षण असूनदेखील नोकरी मिळत नसल्याने नाराजी निर्माण झाली होती. परंतू शेतकरी कामगार पक्षाने रोजगार मेळावा आयोजित केला. चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने घेतलेला मेळावा एक नवी दिशा देणारा ठरला. पहिल्याच मुलाखतीमध्ये मला रोजगाराची संधी मिळाली आहे. इटॉन या कंपनीत मला नोकरी मिळाली आहे. त्यानुसार पत्र मिळाले आहे. त्यामुळे चित्रलेखा पाटील यांचे खूप आभार.

अब्बास अली लदाफ, कुरुळ

माझे शिक्षण बी.टेकपर्यंत झाले आहे. मी गोंधळपाडा येथील रहिवासी आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून व चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने आयोेजित केलेला रोजगार मेळावा माझ्यासाठी खुप महत्वाचा ठरला आहे. पहिल्याच मुलाखतीमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. त्याचा आनंद मला खुप झाला आहे.

मंजिरी रेळकर, गोंधळपाडा

शिक्षण असूनही नोकरी नाही. ही आम्हा तरुणांसाठी मोठी समस्या होती. चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने व शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने रोजगार मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून मला नोकरी मिळाली आहे.

मुग्धा गोंधळी, अलिबाग


Exit mobile version