| अलिबाग | प्रतिनिधी |
गोंधळपाडा येथे उभारण्यात आलेल्या श्री हनुमान आणि श्री गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि.27) सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे. आ. जयंत पाटील यांच्या हस्ते या मंदिरांचे उद्धाटन होणार आहे. यावेळी माजी आ.पंडित पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जि.प.सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, अलिबाग पं.स.च्या माजी उपसभापती मीनल माळी, अजित माळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेंढरे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी केलेेले आहे.