| कोलाड | वार्ताहर |
कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे कोलाडचे संस्थेचे सचिव मा. श्री. संदीप तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 2) वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख, उपप्राचार्या नेहल प्रधान सर्व विभागाचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सावळे सतीश यांनी केले. मार्गदर्शन मनोगतात प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख सर म्हणाले की महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाचन संकल्प हा उपक्रम आयोजित केला आहे. सर्व महाविद्यालयात असा उपक्रम वाचनाची प्रेरणा मिळावी तसेच विद्यार्थ्यांना चांगले पुस्तक ग्रंथांचे वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाकावी आज आपण 21व्या युगात तंत्रज्ञानाच्या या जगात पुस्तके विसरलो आहोत. पुस्तकांची जागा आता मोबाईल, कॉम्प्युटरने घेतली आहे. वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. पुस्तके फूटपाथवर आणि मोबाईल हातात आले आहेत असे जर झाले तर पुस्तके कोण वाचणार? असा एक प्रश्न समाजाला पडला आहे. पुस्तकांमुळे मस्तक सुधारते असे आपण म्हणतो, वाचाल तर वाचाल ही म्हण काही खोटी नाही. प्रत्येकांनी ग्रंथ वाचून आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला जागृत केले पाहिजे व जीवनात योग्य अयोग्य याची शहानिशा करून आपले जीवन चांगल्या प्रकारे जगता यावे यासाठी पुस्तकांचे वाचन करणे ही काळाची गरज आहे, असे यावेळी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आभार डॉ. सतीश सावळे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित राहून सहकार्य केले.