दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
| पनवेल | वार्ताहर |
कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात तपास करून आरोपींना अटक केली आहे.
कामोठे येथील ड्रीम्स सोसायटी फ्लॅट नं. 104 से. 6, ता. पनवेल येथे गॅस लीक होऊन गॅसचा वास येत आहे, अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी कामोठे पोलीस ठाणेचे बीट मार्शल पोहचले असता फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी फायर ब्रिगेडचे स्टाफच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता इसम जितेंद्र भुषण जग्गी (45) व त्याची आई गिता भूषण जग्गी (70) हे मृत अवस्थेत वेगवेगळे बेडरुमध्ये मिळून आले होते. त्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. प्रथमदर्शनी केलेल्या तपासात मयत इसमांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी जिवे ठार मारल्याचे दिसून येत होते. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस परिमंडळ 2 चे उप आयुक्त, प्रशांत मोहिते, सपोआ अशोक राजपूत, अजयकुमार लांडगे, यांनी भेट दिली. गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सपोआ, पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली 4 व सपोआ, गुन्हे शाखा यांचे पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा, कक्ष 2, गुन्हे शाखा, कक्ष 3 कडील विविध तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान पोउपनि किरण राऊत, व पोउपनि अमोल चौगुले, यांनी तांत्रिक तपास व साक्षीदारांकडे विचारपूस करून संज्योत मंगेश दोडके (19) या संशयित आरोपीबद्दलची माहिती पथकांना दिली होती. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना पोहवा तुकाराम सुर्यवंशी, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन संज्योत मंगेश दोडके (19) आणि शुभम महिंद्र नारायणी (वय 19 वर्षे) यांना उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता मयत जितेंद्र जग्गी हा त्यांचे चांगले परिचयाचा असून मयताने त्यांना 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री त्याचे फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी बोलावले होते. तिथे तिघेही दारु प्याले. त्यानंतर मयत जितेंद्र जग्गी हा त्यांना समलैंगिक संबंध ठेवणेकरिता आग्रह करत असल्याने शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारुन त्याला जीवे ठार मारले, तर संज्योत दोडके याने मयतच्या आईचा गळा आवळून ठार मारलेचे आणि जाताना मोबाईल फोन, पाकीट, टॅब व काही दागीने नेले. दोन्ही आरोर्पीना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे या करीत आहेत. सदरची कामगिरी सपोआ, पनवेल विभाग अशोक राजपूत, व सपोआ गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे शाखा कक्ष 2. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, गुन्हे शाखा, कक्ष – 3: वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, कामोठे पोलीस ठाणे, सपोनि अजित कानगुडे, पोउपनि मानसिंग पाटील, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि माधव इंगळे, गुन्हे शाखा कक्ष – 2 सपोनि संतोष चव्हाण, सपोनि एकनाथ देसाई, सपोनि सुरज गोरे, पोउपनि लिंगराम देवकाते, पोउपनि आकाश पाटील, गुन्हे शाखा कक्ष 3 पोउपनि किरण राऊत, कामोठे पोलीस ठाणे, पोउपनि अमोल चौगुले, कळंबोली पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष 2 चे पोहवा रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजीत कानु, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी पार पाडली.