। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल जवळील सेक्टर आर-2 वडघर-चिंचपाडा येथून एक मोटार सायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. शशिकांत भोईर यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल ही सदर ठिकाणी उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






