। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील वळवली गाव बस स्टॉप येथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.
सदर व्यक्तीचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, उंची 5 फुट, डोक्याचे केस काळे, पुढील बाजूस टक्कल पडलेले, दाढी काळी-पांढरी बारीक फ्रेंच कट असलेली, मिशा काळ्या पांढर्या वाढलेल्या, व्यक्तीचा रंग सावळा आहे. त्याच्या गळ्यामध्ये काळ्या पांढर्या रंगाच्या मण्यांच्या दोन माळा आहेत. तसेच तो अंगाने मध्यम आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे किंवा सपोनि राजरत्न खैरनार यांच्याशी संपर्क साधवा.






