नेने महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

| पेण | प्रतिनिधी |

एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये हिंदी विभाग, डीएलएलई युनिट आणि एनएसएस युनिट यांच्यातर्फे शनिवारी वाचक प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

देशाचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म 15 आक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथील धनुषकोडी येथे झाला होता. त्यांच्या 92व्या जयंतीनिमित्त सदरचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेशजी नेने यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी प्रास्ताविक केले. वाचन म्हणजे केवळ छापील बाब वाचणे नव्हे; ऐकणे व पाहणे होय. तसेच प्रत्येक छापील बाब डोळसपणे वाचणे गरजेचे आहे. जीवनाच्या परीक्षेत पास होण्यासाठी वाचानाच्या पलिकडे वाचणे गरजेचे आहे, असे धारप यांनी सांगितले.

डीएलएलई युनिटचे प्रमुख प्रा. डॉ. देवीदास क.बामणे यांनी डॉ.ए.पी.जे. अब्बदुल कलाम यांचा जीवनपट शब्दांकित केला. अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो तो पहले सूरज की तरह जलना सीखो, असे कलाम यांचे वाक्य उपस्थितांना सांगितले. त्यानंतर महाविद्यालयातील विविध शाखांतील अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे.अब्बदुल कलाम यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. हिंदी प्रबोधन सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या , सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व आंतरराष्ट्रीय बालिका दिवसा निमित्त बेटी विषयावर स्वरचित काव्य, सेव फूड, सेव गर्ल, सेव वाटर आदी विषयावर स्पर्धा झाली. या स्पर्धेतील विद्यार्थाना महविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते व रायगड जिल्हा समन्वयक डॉ.देवीदास बामणे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास एनएसएस युनिटचे प्रकल्प अधिकारी डॉ. सुभाष लकडे, लायब्ररीयन जोशी, विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ.देवीदास बामणे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता प्रा. विजया ठाकुर यांनी केली.

Exit mobile version