बंडखोर आमदारांचा पोलिस यंत्रणेवर दबाव

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वेश्वी मतदान केंद्रात ठाण मांडून बसलेल्या उमेदवार जयंत वॉर्डे यांना मतदान केंद्रात थांबू नका असे सांगणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यांना आपण उमेदवार आहोत असे सांगितले. त्यावर उमेदवार आत मध्ये जावून येवू शकतात मात्र केंद्रात थांबायला परवानगी नसल्याचे सांगितले. त्यावर मला आमदारांनी थांबायला सांगितले आहे असे उत्तर त्यांनी दिले.

त्यामुळे पोलिस यंत्रणेवर बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांचा दबाव असल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी बुथवर शेकापक्षाची चार पेक्षा अधिक कार्यकर्ते दिसले की दरडावणारे पोलिस अधिकारी विकास आघाडीच्या बुथवर मात्र पन्नास हून अधिक कार्यकर्त्यांची गर्दी असूनही पोलिस कोणतीच कारवाई करीत नसल्याने संपूर्ण निवडणूक वेळेत पक्षपात पहावयास मिळत होता.

Exit mobile version