| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यात 24 एप्रिल रोजी ‘पंचायती राज दिन’ पुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी रा.जि.प. केंद्र शाळा पुगाव येथे पोस्टर, निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव विषयांवर पोस्टर्स तयार केले होते. काही विद्यार्थ्यांनी निबंध व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांक पटकाविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला.
यावेळी वक्तृत्व स्पर्धेत मुग्धा अधिकारी प्रथम इयत्ता 2 री, स्वरा कळमकर द्वितीय इयत्ता 3 री, शुभ्रा तळकर तृतीय इयत्ता 2री. निबंध स्पर्धेत अक्षरा कळमकर प्रथम इयत्ता 3री, अथर्व दिघे द्वितीय इयत्ता 4 थी, ज्ञानेश्वरी देशमुख तृतीय इयत्ता 4थी. पोस्टर स्पर्धेत प्रज्ज्वल येलकर प्रथम इयत्ता 3री, अदिती देशमुख द्वितीय इयत्ता 4 थी, जय सुतार तृतीय इयत्ता 4 थी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुगाव सरपंच नेहा म्हसकर, उपसरपंच राम धुपकर, सदस्य गणेश म्हसकर, नारायण धनवी, बबन म्हसकर, विश्वनाथ अधिकारी, विठ्ठल येलकर, केशव अधिकारी, वैदेही तळकर, नीळकंठ कदम, ग्रामसेविका म्हात्रे, सुरेश घोगले, अनंता घोगले, असंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.