गणपती अथर्वशीर्षाचे मुशेत येथे पठण

। अलिबाग । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील लहान मुलांनी घरोघरी जाऊन सामुहिकरित्या गणपती अथर्वशीर्षाचे सामुहिक पठण करण्याचा उपक्रम राबविला. संपदा संदीप पोंगडे यांनी गेली चार वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविला. पुढील आठवड्यात साजर्‍या होणार्‍या साखरचौथ गणेशोत्सवात देखील हा उपक्रम राबविला जाणार आहे. लहान मुले हे मोबाईलमध्ये दंग असल्याचे सर्रास पाहिले जाते. पण मुशेतमधील या मुलांनी अथर्वशीर्षाचे पठण करुन नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांकडून त्यांच्या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.

Exit mobile version