मुरुडमध्ये सामूहिक नमाज पठण

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यात मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यादिवशी पारंपारिक प्रथेप्रमाणे मुस्लिम बांधवांनी सकाळी मुरुड जवळील ईदगाह या धार्मिक स्थळावर जाऊन सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदगाह याठिकाणी सुमारे 1200 बांधव याप्रसंगी उपस्थित होते, अशी माहिती मुरुड दुकाने असोसिएशनचे अध्यक्ष जाहिद फकजी यांनी दिली.

आजच्या दिवसाला ईद-उल-फित्र असे म्हटले जाते. हा सर्वत्र सौहार्द वाढविण्याचा दिवस आहे, असे जाहिद फकजी यांनी सांगितले. 125 वर्षांपूर्वी जंजिरा नबाब यांनी ऐतिहासिक ईदगाहची निर्मिती केली असून ईदची पहिली नमाज सामूहिकपणे त्या काळात अदा केली होती. आजही सामूहिक नमाज अदा करण्याची प्रथा सुरू आहे.

Exit mobile version