रायगड प्रदक्षिणेस विक्रमी उपस्थिती

| महाड | वार्ताहर |

युथ क्लब आणि रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा रविवारी पार पडली. या प्रदक्षिणेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदक्षिणेचे हे 32 वे वर्ष असून, वेबसाईट, ऑनलाईन प्रवेश यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काही वर्षापूर्वी घटत चाललेली प्रदक्षिणार्थीची संख्या वाढल जाऊन यंदा या मोहिमेत सुमारे 650 प्रदक्षिणार्थी सहभागी झाले होते.

छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा झेंडा फडकावून सकाळी सहा वाजता सुरु झालेली ही प्रदक्षिणा संध्याकाळी पाच वाजता पूर्णत्वास आली. या मोहिमेस रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे उप पोलीस अधीक्षक शंकर काळे तसेच महाड तालुकामधील चार पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी असा 22 जणांचा गट तसेच डिपार्टमेंट ऑफ पोस्टचे सुप्रिडेंट सुनील थळकर या प्रदक्षिणामध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, नाशिक, बीड़, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, इचलकरंजी अशा विविध जिल्हातून 650 प्रदक्षिणार्थी या प्रदक्षिणेत सहभागी झाले होतें. प्रदक्षिणार्थीना प्रदक्षिणा पूर्ण झाल्या प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

Exit mobile version