माणगावमध्ये रेकॉर्डब्रेक लसीकरण

शेकाप युवानेते निलेश थोरे, पं.स. सदस्या रचना थोरे यांचे प्रयत्न
माणगांव | प्रतिनिधी |
माणगांव तालुका शेकाप युवा नेते व तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती निलेश थोरे व पंचायत समिती सदस्या रचना थोरे यांच्या प्रयत्नाने माणगाव शहरात बालाजी कॉम्प्लेक्स मधील निलेश थोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी 23 सप्टेंबरला तालुका व शहरातील एकूण 300 नागरीकांसाठी पहिला डोस व दुसरा डोस असे कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे, सुभाष सोसायटी चेअरमन बाळकृष्ण आंबूर्ले, खरेदी विक्री संघाचे संचालक राजेश कासारे व विविध तालुक्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. या लसीकरणाचा तालुक्यातील एकूण 300 नागरिकांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाकरिता आरोग्यसेवक राजेंद्र खाडे यांनी विशेष योगदान देऊन शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले तर परिचारिका सौ.गीता गोसावी व परिचारिका सौ.निकिता अनमाने यांचे खूप मोलाचे योगदान लाभले.
शिबिराच्या उदघाटनाला कर्ज व देखरेख विभाग मुख्य व्यवस्थापक मा. भारत नांदगावकर, अलिबाग विभागीय अधिकारी भरत पाटील, माणगाव विभागीय अधिकारी संजीव देशमुख, महाड विभागीय अधिकारी राजू मोरे, तळा विभागीय अधिकारी, माणगाव तालुका कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे, बँकेच्या ए शक्ती प्रकल्पच्या व बचत गट विभागाच्या प्रमुख शमा नागवेकर व समिता पाटील, माजी सरपंच अमोल मोहिते, उपसरपंच दिनेश गुगले, शेकाप जेष्ठ कार्यकर्ते रमेशजी बक्कम, माणगाव चे निरीक्षक डी.एम.जाधव,नितीन मोहिते, युवा कार्यकर्ते प्रदीप लांगे, अजय उभारे, सौरभ पांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कासारे यांनी केले.
माणगांव तालुका शेकाप युवानेते निलेश थोरे आणि अलिबाग पंचायत समिती सदस्या सौ रचना निलेश थोरे यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो.की माणगांव तालुक्यातील त्यांच्या प्रयत्ननाने आज राबवत असलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन करण्याकरीता त्यांनी एक सहकार प्रशासकीय अधिकारी म्हणून मला आमंत्रित केले,असे प्रदीप नाईक म्हणाले.

निलेश थोरे यांचा माणगांव तालुक्यात होणार्‍या सर्वांगीण विकासात महत्वाचा वाटा आहे.तरुण व उमदे नेतृत्व शेकापला मिळाल्यामुळे तालुक्यात पक्षाचे काम जोमाने वाढत आहे.कोविड सारख्या महामारीमध्ये जनजागृती चे काम अनन्यसाधारण आहे,आणि ते काम निलेश थोरे व त्यांचे सहकारी शेकाप मधील जेष्ठ व युवा नेते व पदाधिकारी अगदी सुरुवातीपासून करत आलेले आहेत.त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.
प्रदीप नाईक
मुख्य कार्यकारी अधिकारी

Exit mobile version