। माणगाव । वार्ताहर ।
भाजपची माणसे आपली कमळ निशाणी घेऊन उभे राहू शकत नाही येथेच ममता थोरे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी माणगाव उतेखोल गावात झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले. माणगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्र.4 च्या शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ममता थोरे यांच्या प्रचारार्थ खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन उतेखोल गावात करण्यात आले होते.त्यावेळी उपस्थितांना खा.सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, आनंद यादव,शैलेश भोनकर, अनंता थळकर,माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, सुमित काळे,अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे, संजय पंदेरे, शेकाप तालुका सहचिटणीस राजेश कासारे, राजेंद्र शिर्के, नितीन वाढवळ,जयंत बोडेरे, दीपक थळकर, सौरभ चांदोरकर आदींसह शेकाप – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.