| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूक 2024 निकालाचे पडसाद दिवसभर देशातील शेअर बाजारावर दिसतील. जस जसे बहुमताचे चित्र स्पष्ट होईल, तसा मंगळवारी शेअर बाजार रंग दाखवेल. सोमवारी शेअर बाजाराने जोरदार तेजीचे सत्र अनुभवले. आज पण शेअर बाजारात तेजीचे सत्र असण्याची शक्यता आहे. पण शेअर बाजार 2200 अंकांनी कोसळला आहे. सध्या सकाळी 09:11 वाजता बीएसईमध्ये घसरणीचे सत्र दिसत असले तरी निकालाचे चित्र स्पष्ट होताच निर्देशांक दुडूदुडू धावेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या दाव्यांना परदेशी पाहुण्यांचा ठेंगा, लोकसभा निकालापूर्वीच शेअर बाजारातून इतके कोटी नेले मायदेशी
सकाळी निकालसमोर येताच मोठा बदल
निफ्टीचे मजबूत संकेत निफ्टी चा वायदा सकाळी जवळपास 150 अंकांनी वधारला होता. निफ्टी सकाळी 23,560 अंकावर पोहचला होता. त्यमुळे आज पण भारतीय बाजार कमाल दाखविण्याची शक्यता आहे. प्री-ओपन सेशनमध्ये बाजाराने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण बाजार उघडताच आणि निकाल हाती येताच चित्र पालटू शकते.
गेल्या दोन महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरु आहे. सकाळी 8 वाजेपासून देशभरात मत मोजणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत. तर काही दिग्गजांना अजून ही मुसंडी मारता आलेली नाही. बाजार आता उघडला आहे. त्यामुळे या सुरुवातीच्या निकालाआधारे बाजार प्रतिक्रिया देईल. पण हे चित्र तळ्यात-मळ्यात असेल. पुढील एक तासात अनेक ठिकाणी आघाडीच्या बातम्या येताच तशी प्रतिक्रिया बाजार देईल. एक दिवसापूर्वी बाजाराने मोठ्या रॅलीचे संकेत दिले आहे.
सेन्सेक्सचा ऑल टाईम रेकॉर्ड सोमवारी बीएसई सेन्सेक आणि एनएसई निफ्टी दोन्ही निर्देशांकानी नवीन रेकॉर्ड तयार केला. सेन्सेक्सने 2,507.47 अंक (3.39 टक्के) आघाडीसह 76,468.78 अंकाचा टप्पा गाठला होता. आजही ही दोन्ही निर्देशांक मोठी भरारी घेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
निफ्टीची दमदार कामगिरी एनएसई निफ्टी इंडेक्सने काल 23,338.70 अंकांची नवीन उच्चांकी कामगिरी करुन दाखवली. अखेरच्या टप्प्यात निफ्टी 733.20 अंक वा 3.25 टक्क्यांच्या जबरदस्त तेजीसह 23,263.90 अंकावर बंद झाला. इतक्या दिवसांच्या व्यापारी सत्रात निफ्टी बँक इंडेक्स पहिल्यांदा 50 हजार अंकांचा टप्पा पार करु शकला.
का झाली 99.97% घसरण न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की, अमेरिकेतील काही प्रमुख समभागांसाठी ट्रेडिंग थांबवली आहे. तसेच बर्कशायर हॅथवे शेअरमध्ये 99.97% घसरण झाल्यानंतर याबाबत निर्माण झालेली तांत्रिक समस्या सोडवली गेली आहे. आता हे स्टॉक पुन्हा उघडले आहेत. आता सर्व सिस्टम कार्यरत आहे. तसेच सायबर हल्ल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे संकेत अद्याप मिळाले नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले.
40 शेअरची ट्रेडींग थांबवली एनवायएसई प्रवक्त्याने सांगितले की, शेअर बाजारात एक तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे एनवायएसई ग्रुप एक्सचेंजेसवर सूचीबद्ध केलेल्या 40 शेअरची ट्रेडींग थांबवण्यात आली. ही समस्या सॉफ्टवेअर संबंधित असण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे चिपोटल आणि बर्कशायर हॅथवे यांच्या कंपन्यांचा समावेश आहे. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी चालवलेल्या होल्डिंग कंपनी यामध्ये आहे.







