एसटी महामंडळातर्फे निवृत्त चालकांची नेमणूक

मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही सुरू असल्याने आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे.यावर उपाय म्हणून आता जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने घेतले जाणार आहे.तशी जाहिरातही महामंडळाने प्रसिद्ध केलेली आहे.
एसटीच्या विलिनीकरणासाठी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर रूजू होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांच्या विरोधात निलंबनासह बदलीची कारवाई करण्यात आली आहे. . त्यामुळे गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही सुरू असल्याने आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळाने वाहतूक सुरू करण्यासाठी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी एसटी महामंडळाने आक्रमक पवित्रा घेत सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना कामावर येण्याची संधी दिली आहे. एसटी महामंडळाने त्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार चालकाचे वय 62 वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे. करार पद्धतीवर नेमणूक होणार्‍या चालकांना दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत, असे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version