| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये गेली काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या पावसाने थैमान घातले आहे. शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच राहिली. रविवारी (दि.28) रेड तर सोमवारी(दि.29) ऑरेंज तसेच मंगळवारी (दि.30) येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी व सोमवारी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे नदी, समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.







