रायगडला रेड अलर्ट

| मुंबई | प्रतिनिधी |

हवामान विभागाने येत्या 24 तासात कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात रेड अलर्ट आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून येत्या दोन दिवसात विदर्भाच्या काही भागात, छत्तसीगढ आणि ओडिशात पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Exit mobile version