आयात शुल्क कपातीने खाद्यतेलाचे दर कमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पाम, सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील आधार आयात कर केंद्र सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार क्रूड तसेच रिफाईंड पाम, सोया व सूर्यफूल तेलावरील आधार आयात कर कमी केले आहे. त्यामुळे  ील खाद्यतेल 3 ते 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे.  बेस आयात शुल्क कमी केल्यामुळे नागरिकांना मात्र काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. खाद्यतेलाच्या आयातीचा विचार केला तर याबाबतीत भारत जगात आघाडीवर आहे. देशाला दोन तृतीयांश खाद्यतेलाची आयात विदेशातून करण्यात येते. विशेषतः इंडोनेशिया आणि मलेशिया येथून मोठ्या प्रमाणावर पामतेलाची आयात होते.

Exit mobile version