| रायगड | वार्ताहर |
मुंबईतील रिल स्टारचा 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झल्याची घटना माणगावच्या कुंभे धबधबा येथे घडली आहे. पावसाळी पर्यटनाचा रायगड मध्ये आणखी एक बळी गेला आहे. अन्वी कामदार असे मृत तरूणीचे नाव आहे. मुंबईतल्या माटुंगा इथून पावसाळी पर्यटनासाठी आली होती. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या तरूणीचा रिल बनवण्याच्या नादात जीव गेला आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील कुंभे आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक येत असतातय. त्यात अति उत्साही तरुण तरुणी रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्साहाच्या भारत नको त्या धोकादायक ठिकाणी पोहोचतात. मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटेंट असेलेली 27 वर्षीय आनवी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत 16 जुलै रोजी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी आली होती. परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला आहे.