दहीहंडी उत्सवानिमित्त रिल्स स्पर्धा

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव यंदाही मोठ्या थाटात पार पडणार आहे. त्यानिमित्त यंदा पहिल्यांदाच रिल्स स्पर्धेचे आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी दि. 22 ऑगस्टपासून 25 ऑगस्टपर्यंत शेतकरी भवन, अलिबाग येथे सकाळी 10 ते सायं. पाच या वेळेत करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पहिल्यांदाच रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास दहा हजार रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास सात हजार रोख व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास पाच हजार रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे असतील. संपूर्ण रिल ही शेतकरी भवन येथे साजरा होणार्‍या दहीहंडी उत्सवावर आधारित असावी. रिलचा एकूण कालावधी 30 सेकंदाचा असावा. रिल बनवण्याकरिता कोणत्याही साधनाचा वापर करावा (उदा. डीएसएलआर कॅमेरा, गोप्रो इ.), रिल चित्रित करण्याकरिता ड्रोन कॅमेराचा वापर करीत असल्यास त्याची शासकीय परवानगी घेणे ही स्पर्धकाची जबाबदारी असेल. आयोजक कोणतीही जबाबदारी घेणार नाही याची दक्षता घ्यावी. नोंदणी केलेल्या स्पर्धकाने आयोजक सूचना करतील त्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो करणे बंधनकारक आहे. तसेच आयोजकांमार्फत देण्यात येणारे हॅशटॅग वापरणेसुद्धा बंधनकारक आहे. दहीहंडी उत्सवानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आयोजकांनी सांगितलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला कोलॅब्रेट-टॅग व हॅशटॅग नमूद करणे बंधनकारक आहे. रिल स्पर्धेमध्ये आयत्या वेळी बदल करणे अथवा न करणे याचे सर्व अधिकार आयोजकांचे असतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. रिल स्पर्धेत भाग घेण्याकरिता प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंदार सिनकर 8698446001, संदीप जगे 8698662866 यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version