करंबेत सोनोग्राफी सेंटरमुळे नवसंजीवनी

| म्हसळा | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना गेली 60-70 वर्षे सोनोग्राफीची सोय नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. कोलमांडला, बागमांडला, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, दिघी आणि म्हसळा तालुक्यात 84 गावातील गोरगरीब, खेडापाड्यातील रुग्णांना सोनोग्राफीसाठी माणगाव, महाड, रोहा अशा ठिकाणी जावे भाग पडत होते. यासाठी रुग्णांचा पूर्ण दिवस वाया जात असे. आर्थिक तसेच प्रवासाची दगदग यामुळे तर रुग्ण हैराण होत होते.

म्हसळा हे श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील रुग्णांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी सोईस्कर ठिकाण आहे. गेली कित्येक वर्षे म्हसळा येथे सोनोग्राफी सेंटर व्हावे हि या दोन्ही तालुक्यातील जनतेची मागणी होती. स्थानिक डॉ.अलंकार दिलीप करंबे हे डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली आणि सोनोग्राफीमुळे रुग्णांची किती गैरसोय होते हे जवळून पहिले. रुग्णांची गैरसोय दूर करण्याचा निश्चय केला आणि अगदी काही अवधीतच त्यांनी सोनोग्राफी सेंटर सुरु केले. त्यामुळे परिसरातील रुग्णाना नवसंजीवनी मिळाली आहे.

Exit mobile version