नातेवाईकांनी मारला दागिन्यांवर डल्ला

। पनवेल । वार्ताहर ।

घरी पाहुणे म्हणून राहावयास आलेल्या नातेवाईकांनी दागिने चोरून नेल्याची घटना विचुंबे येथे घडली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राधिका चौहान या विचुंबे येथे राहत असून, त्यांचे दोन नातेवाईक त्यांच्या घरी आले होते. त्यांनी जेवण करून घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका उठल्या असता त्यांना घरातील साहित्य विस्कटलेले दिसले. रोख रक्कम 15 हजार, सोन्याचे दागिने, चांदीच्या अंगठ्या, मोबाईल, मनगटी घड्याळ, एटीएम कार्ड सापडून आले नाहीत. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version