मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनाच पावसाचा फटका

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका आमदारांना बसला आहे. अधिवेशनसाठी अनेक आमदार एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येत होते. पण, जोरदार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसोबत आमदारांना देखील सहन कराला लागला. विदर्भ, अमरावती एक्स्प्रेस कुर्ला, घाटकोपर दरम्यान अडकली. यावेळी मराठवाडा आणि विदर्भातील 10 ते 12 आमदार ट्रेनमध्ये होते. मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम झाला होता. बाहेरुन येणार्‍या गाड्या मध्येच थांबल्याने मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांची रेल्वे ट्रॅकवरुन पायपीट झाली. संजय बनसोडे हेही लातूर येथून येणार्‍या ट्रेनमध्ये अकडले. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मंत्री हसन मुश्रीफ अडकले. त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज रद्द करावे, अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.

Exit mobile version