| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बोर्लीपंचतन शाखेचे येथील राजलक्ष्मी इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. बँकेचे संचालक आणि म्हसळा तालुका शेकाप चिटणीस संतोष पाटील यांच्या हस्ते फित कापून हे स्थलांतर करण्यात आले.
यावेळी बोलतांना संतोष पाटील म्हणाले की, आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकेने नुकताच 7 हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. आगामी काळात 10 हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार करण्याचा बँकेचा मानस आहे. आरडीसीसी बँकेच्या ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सुविधा नेहमीच मिळत असून तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचणारी आपली ही एकमेव बँक आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व साई ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्याम भोकर, उपाध्यक्ष प्रदिप खोपकर, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते लिलाधर खोत, सुरेश धोपट, दत्ता खोत, अनिल मांजरेकर, म्हसळा शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते एन.डी. मोहीते, अनिल मांजरेकर, सदानंद खेऊर, संदेश किर, बँकेचे उपमुख्य व्यवस्थापक आर.डी. मोरे, विभागिय अधिकारी एस.टी. पाटील, नरेश कोळी, म्हसळा शाखा व्यवस्थापक एम.एस. मुंडे, मजगाव शाखाधिकारी डी.बी. सरदार, बोर्लीपंचतन शाखेचे शाखाधिकारी पी.व्ही. खेऊर, माणगाव तालुका निरीक्षक ए.पी. बारटक्के, एस.जी. शिर्के, श्रीवर्धन तालुका निरीक्षक एल.जी. रिकामे, म्हसळा तालुका निरीक्षक व्ही.बी. पयेर व संकेत अपराध आदि उपस्थित होते. यावेळी बॅकेच्या काही खातेदारांनी बँकेचे अध्यक्ष जंयत पाटील यांच्यासह संचालक मंडळ आणि व्यवस्थापक प्रकाश खेउर यांना विशेष धन्यवाद दिले.







