सुदर्शन केमिकलचा उल्लेखनीय प्रयत्न

महिलांना बनविले स्वावलंबी

| खांब | वार्ताहर |

सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि. च्या सामाजिक जबाबदारीतील सीएसआर उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न साकारला आहे.

सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनने रोहा (सुंदरनगर) येथे युनिफॉर्म स्टिचिंग सेंटरची स्थापना करून होतकरू महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी निर्माण केली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यात एकंदरित कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या 1500 युनिफॉर्म्सची ऑर्डर कंपनीनेच दिल्याने महिलांना प्रोत्साहन फळ नवा आत्मविश्वास मिळाला आहे. कंपनीच्या सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या सेंटरचे उद्घाटन सुदर्शन कंपनीचे रोहा साईट हेड विवेक गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश बांभुरकर, संतोष मुंढवे, पराग फुकणे, ॲड. विशाल घोरपडे, रवि दिघे, महेश डेरीया, स्वाती मोहिते, समीर वाडवळ व अमर चांदणे आदी उपस्थित होते.

महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने युनिफॉर्म स्टिचिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना आता शासकीय, खासगी संस्था आणि औद्योगिक युनिफॉर्म्सची मागणी पूर्ण करता येईल, असा विश्वास यावेळी कंपनीने व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थित महिला उद्योजकांनी आपल्या आत्मविश्वासाच्या यशस्वी कथा सांगितल्या. तर, कंपनीचे अधिकारी शिवदास बनकर व संतोष मुंढवे यांनीही महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन केले.

Exit mobile version