वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव वाहतूक पोलीस हे नेहमीच माणुसकीपणा दाखवीत उल्लेखनीय कामगिरी करीत असतात. या वाहतूक पोलिसांनी अशीच एक उल्लेखनीय कामगिरी करीत माणगाव बस स्थानक आवारात असणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला तिच्या राहते घरी सुखरूप पोहचविले. वाहतूक पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, माणगाव एसटी बस स्थानक आवारात भागाबाई मांगले रा.महागाव ता. तळा ही वयोवृद्ध महिला बराच उशिरा उभी होती. सदर महिलेकडे माणगाव वाहतूक पोलीस शिवराज बांडे, पोलीस कॉन्स्टेबल बोडके यांनी विचारपूस करून त्यांच्या मुलाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना गावाला महागावकडे जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने वाहतूक पोलीस बांडे व बोडके यांनी सरकारी वाहन उपलब्ध करून महिलेला तसेच पोलीस पाटील मांगले व त्यांचा मुलगा प्रभाकर मांगले यांना सुखरूपपणे घरी पोहचविले. माणगाव वाहतूक पोलिसांनी हा माणुसकीपणा दाखविल्याने मांगले परिवाराने व महागाव ग्रामस्थांनी वाहतूक पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.

Exit mobile version