अनधिकृत टपरीवरील प्लास्टिक हटविले

| नेरळ । वार्ताहर ।

नेरळ बाजारपेठ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून बांधण्यात आलेल्या काँक्रीटच्या रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर प्लास्टिक आच्छादन टाकून टपर्‍या उभारण्यात आल्या आहेत. पादचार्‍यांना चालण्यास जागा नसल्याने फुटपाथवर व्यवसाय करताना त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आच्छादन मंगळवार (दि.15) नेरळ ग्रामपंचायत कडून काढण्यात आले आहे. त्याचवेळी फुटपाथ वर व्यवसाय करताना पथारी मांडून व्यवसाय केला तरी कारवाई करण्याचा इशारा नेरळ ग्रामपंचायतने दिला आहे.

त्या रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेले फुटपाथ हे नेरळ गावातील रहिवाशी यांना चालण्यासाठी बांधले असताना त्या फुटपाथवर आधी टोपली मधून आणि नंतर प्लास्टिक आच्छादन टाकून टेबल उभे करून व्यवसाय केला जात आहेत. त्याबद्दल सातत्याने नेरळ ग्रामपंचायवर स्थानिकांकडून ताशेरे ओढले असून फुटपाथ हे पादचारी यांना चालण्यासाठी असताना त्या ठिकाणी प्लास्टिक आच्छादने टाकून छप्पर बांधण्यात आली. ती प्लास्टिक आच्छादने आणि टपरी यामुळे स्थानिकांकडून सतत येणार्‍या तक्रारी लक्षात घेऊन ग्रामपंचायतने नोटीस देऊन केली होती. मात्र टपरीधारक कोणाचेही ऐकून घेत नसल्याने कारवाई करण्यात आली.हि कारवाई होत असताना नेरळ ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि सदस्य जातीने हजर होते तर ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांच्या देखरेखीखाली कर्मचारी वर्ग यांनी हि कारवाई केली.

Exit mobile version