ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे नुतनीकरण

| तळा | वार्ताहर |

श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे नुतनीकरण उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते मंगळवार (दि.23) करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात यशवंत मोंढे यांनी 27 वर्षातील प्रगतीचा आलेख विषद केला. कृष्णा महाडिक यांचे प्रयत्नांतून शाळांच्या इमारती, शौचालये, पाणी व्यवस्था, अशा सुविधा अनेक शाळांमधे पुरविण्यात आल्या. तर मंदार शर्मा यांच्या योगदानातून चांगल्या वर्ग खोल्या इमारत झाली. यावेळी कृष्णा महाडीक, यशवंत मोंढे, दिपक रसाळ, किरण चव्हाण, मंदार शर्मा, मनोहर काप, नितीन पोंदकुळे, सुनिता पालकर, कानू विचारे, पांडुरंग माळी, नाना दळवी, आनंद माळी, गणेश काप, रामदास मोरे सर्व संस्थापक सदस्य,पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आजी-माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पालकर यांनी केले.

Exit mobile version