सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत नितीन देसाई यांनी आपले आयुष्य संपवले आहे.

सकाळी सफाई कामगार स्टुडिओत गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.’1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.

Exit mobile version