‘सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करा’

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या उपनगरीय रेल्वे स्थानक असल्याने मागील काही वर्षात झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढलेल्या नागरीकरणाबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांचा वावरदेखील वाढत चालला आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकाबाहेर अनेक महिने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावेत, अशी मागणी छत्रपती शिवाजी तक्रार निवारण केंद्र यांच्याकडून करण्यात आली आहे.

गेल्या एक महिन्यांपूर्वी कर्जत शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असताना काही सीसीटीव्हीमध्ये हे चोर थेट रेल्वे स्थानकातून येऊन भिसेगाव जुने एस टी स्टँडकडे जाताना दिसत होते. तरीदेखील अजूनपर्यंत मुख्य भागातील सीसीटीव्ही बंद का ठेवले आहेत, असा प्रश्‍न समोर येत आहे. शहराची सुरक्षा लक्षात कर्जत पोलीस ठाणे यांनी मुख्य भाग असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेरील खूप महिने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित लावावेत व नागरिकांची सुरक्षा जोपासावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.

Exit mobile version