काशीद पुल तात्काळ दुरुस्त करा ; आ. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा

काशिद दुर्घटनास्थळी पाहणी केली, शेकाप सर्वोतोपरी मदत करणार
शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी केली पाहणी

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील काशीद येथील पुल दुर्घटनेनंतर मंगळवारी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी मुरुडला जोडणाऱ्या काशिद पुलाची तातडीने दुरुस्ती करून सरसकट सर्वांना मदत झाली पाहिजे अशी फोनवर चर्चा होऊन पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे.

अलिबाग-मुरूड राजमार्गावरील काशिद येथील छोटा साकव पूल अतिवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनाग्रस्त भागाची आज चित्रलेखा पाटील यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे या साठी तलाठी, ग्रामसेवकांशी चर्चा केली मी माझ्या परीने नुकसानग्रस्तांना मदत करणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version