| चणेरा | वार्ताहर |
जि. प. शाळा चोरढे येथे शिकविण्यासाठी एका वर्गाची कमतरता भासत होती. त्यासाठी पालकांची या संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात नादुरुस्त इमारत दुरुस्त करण्यासाठी एक दिवस पालकांनी श्रमदान करण्याचे ठरवण्यात आले. दुसर्या दिवशी एकूण 62 पालक श्रमदाना करुन एका दिवसात शाळेची दुरुस्ती करण्यात आली.
या दुरुस्तीत भिंतींना रंग लावणे, किचन शेड सफाई, वर्ग सफाई, पताका लावण्याचे काम करण्यात आले. पालकांचे श्रमदान ( मोडा ) यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश तांबडे, सुनील घाग आदीनी सहकार्य केले. श्रमदान यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संगीता भगत, विजय जाधव, रमेश सुभेदार, राजेंद्र नाईक, प्रतिभा वर्तक यांनी योग्य नियोजन केले. पालक वृंदाचे शाळेला दिलेल्या सहकार्याबद्दल शिक्षकांनी सर्वांचे आभार मानले.