नेरळमध्ये रुळाच्या दुरुस्तीला सुरुवात

| नेरळ । वार्ताहर ।

मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत एन्डकडील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकापुढे असलेले रेल्वे फाटकातील रुळाखाली असलेला पृष्ठभागाची दुरुस्ती करण्यासाठी फाटक बंद करण्यात आले आहे. मात्र जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तब्बल दीड दिवस उशिराने फाटक वाहनांच्या वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. दर दोन वर्षांनी असा ब्लॉक घेऊन फाटक बंद ठेवून रुळाखालील पृष्ठभागाचे दुरुस्तीचे काम केले जाते.

7 ते 12 ऑक्टोबर सकाळ पर्यंत फाटक बंद ठेवले जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र रेल्वेकडून जाहीर केल्यापासून तब्बल दीड दिवस फाटक उघडेच होते. मध्य रेल्वेच्या या अनियोजनाचा फटका वाहनचालक यानं बसला होता. फाटक बंद असल्याची माहिती असलेली वाहने पाच ते दहा किलोमीटर अंतर अधिक पार करून दामत किंवा आंबिवली येथील फाटकातून आपली वाहने घेऊन प्रवास करीत होती.

12 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता फाटक उघडले जाणार होते, ते फाटक कदाचित बुधवीराने उघडले जाऊ शकते. दुसरीकडे सलग पाचहुन अधिक दिवस फाटक बंद ठेवले जात असल्याने वाहनचालकांची आर्थिक नुकसान होत आहे. त्यांची वाहने अधिक किलोमीटर अंतर पार करून आपल्या इच्छित स्थळी जात असताना मोठ्या प्रमाणात वाढीव इंधन वाहनचालक यांना वापरावे लागत आहे. त्यामुळे निर्धारित काम 12 ऑक्टोबर रोपजी सकाळ पर्यंत संपवावे अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version