कृषी कायदे रद्द करा मगच पंजाबामध्ये प्रचार करा

अमरिंदर सिंग यांची मागणी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंजाबमध्ये तुम्हाला प्रचाराला यायचे असेल तर कृषी कायदे रद्द करा, असा सल्ला पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन केला असून पंजाब निवडणुकीत हा पक्ष भाजपशी युती करेल असे सांगण्यात आले होते. मात्र, अमरिंदर सिंग यांनी केलेल्या नव्या मागणीने युतीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी संघटनां दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. कायदे रद्द करण्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही मागणीवर शेतकरी चर्चा करण्यास तयार नाहीत. तसेच सरकारकडूनही कुठलाच संवाद सुरू नाही. त्यामुळे दिल्लीची कोंडी झाली आहे.
या पार्श्‍वभूमीवर अमरिंदर सिंग म्हणाले, ङ्गपंजाबमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी कृषी कायदे रद्द करणे आवश्यक आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी लोक राजकीय पक्षांना प्रचार करू देणार नाहीत. पंजाबमध्ये ही शस्त्रे का येत आहेत? असेही ते म्हणाले.

Exit mobile version