चित्रलेखा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या डॉ. राज प्रॉडक्शन्सतर्फे निर्मिती केलेले ‘बाबाची सोनपरी’ व ‘गो माझे बाय’ या व्हिडीओ साँग्जचे पुनःप्रदर्शन पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पाटील, वरिष्ठ सदस्य प्रदीप नाईक, अनिल जाधव व प्रियदर्शिनी पाटील यांच्या उपस्थितीत लायन्स फेस्टिवलमध्ये शुक्रवारी करण्यात आले.
मागच्या वर्षी सलग चार इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेलं बाबाची सोनपरी हे गाणं एक सर्वसामान्य पिता व त्याच्या मुलीच्या नात्यातील संवेदनशीलता सादर करते. डॉ. राजेंद्र चांदोरकर व त्यांची कन्या संवेदना यांनी भूमिका साकारलेलं हे गीत त्यांनीच गायलं आहे, तर, ‘गो माझे बाय’ हे गीत सध्या यूट्यूब ट्रेंडिंग मराठी गीतांपैकी एक आहे. डॉ. चांदोरकर यांनी सोनाली सोनवणे यांच्याबरोबर हे गाणे गायलं आहे. या दोन्ही गीतांची रचना व संगीत मनिष अनसुरकर यांचं, तर सचिन कांबळे यांनी दिग्दर्शित केले आहे.
या दोन्ही गीतांचं संकलन विशाल गायकवाड यांचं तर चित्रीकरण सुनीत गुरव यांनी केलं आहे. समीर गायकवाड, आशिष बनाटे, सुनील म्हात्रे, सुदेश गायकवाड यांचे सहकार्य झालेल्या या गीतांची डॉ राज प्रॉडक्शन्स बॅनरतर्फे निर्मिती करण्यात आली आहे. फेस्टिवलमध्ये हे दोन्ही व्हिडीओ साँग्ज प्रेक्षकांना दाखविण्यात आले. त्यानंतर लगेचच गो माझे बाय हे गीत डॉ. चांदोरकर व डॉ. अपूर्वा कुमठेकर यांनी स्टेजवर लाईव्ह सादरीकरण केले. वरील दोन्ही गीत डॉ. चांदोरकर यांच्या dr rajendra chandorkar या यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता, असे डॉ. राजेश्री चांदोरकर यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. चांदोरकर यांनी अध्यक्ष ला. संजय पाटील, प्रियदर्शिनी पाटील, चित्रलेखा पाटील, ला. महेश चव्हाण, ला. प्रवीण सरनाईक इतर मान्यवर, लायन्स क्लब सदस्य तसेच उपस्थितांचे आभार मानले.