मंडणगड शहरातील नामवंत शाळेला टाळे

मंडळातील अंतर्गत वादामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मंडणगड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय या नामवंत शाळेला टाळे लावण्याचा प्रकार घडला आहे. संस्थेच्या दोन मंडळातील अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच शैक्षणिक क्षेत्र कार्यरत करण्यात आले. त्यात आता एसटी आंदोलन सुरू असून विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहत असताना आता संस्थेच्या अंतर्गत वादामुळे यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी संस्था संचालकांना जाब विचारत शाळा सूरू केली. यासंदर्भात संतप्त झालेल्या पालकांनी संस्था संचालक यांना घेरावा घालत जाब विचारला व मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये असे सांगीेतले.
यावेळी पालकांनी संस्थेचा वाद मिटत नाही तोपर्यंत प्रशासक म्हणून शिक्षणाधिकारी यांचेकडे शाळेचा कारभार देवून शैक्षणिक नुकसान टाळावे, अन्यथा पालक संस्था संचालकांना सोडणार नाही असा इशाराही दिला.
यासंदर्भात ता.27 नोहेंबर 2021 रोजी संस्था संचालक आणि पालक यांच्यात बैठक होऊन चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ता.18 नोव्हेंबर रोजी शाळेत घडलेल्या प्रसंगावेळी शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी अध्ययनासाठी आलेले असताना वर्गखोल्या व शाळा कार्यालयाला कुलुप असल्याचे पाहीले. हे कुलुप कोणी लावले व कशासाठी याबाबत उलगडा झाला नाही. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी हे वर्गखोली बाहेर होते.
काही दिवसांपूर्वी शाळेच्या कार्यालयाला अज्ञाताने टाळे ठोकले होते. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी व संस्थेतील एक गट पोलीस्थानकात दिवसभर ठाण मांडून होते. त्यामुळे याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर झाला होता. असे असतानाच संपूर्ण शाळेतील वर्ग खोल्यांना टाळे ठोकल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी बाहेरच ताटकळत राहिले.
ही बातमी समजताच शहरातील पालक वर्गाने शाळेत धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. यांत दोन संस्थांच्या वादात विद्यार्थी व शिक्षक पिडले जात असल्याचे पाहून पालक आक्रमक झाले. त्यांनी सरळ उपस्थित संस्था चालक यांनाच फैलावर घेत जाब विचारला. तसेच कुलूप उघडून शाळा सुरू करा अन्यथा शाळेच्या कारभाराबाबत पालक म्हणून योग्य निर्णय करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांनी पालकांच्या वतीने दिल्यानंतर वर्ग उघडण्यात आले.

Exit mobile version